परभणी - हादगाव बु. जि.प.सर्कलच्या समृद्धीसाठी नखाते हे कुशल नेतृत्व - आ. विटेकर
परभणी, 30 डिसेंबर, (हिं.स.)। विकासाची जाण असलेले कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून वाल्मिकी अर्बन बँकेचे चेअरमन अनिलराव नखाते यांच्याकडे हादगाव बु जि.प.सर्कलमधील वडीसह सर्व गावांतील समस्या मार्गी लावण्याची जबाबदारी सोपवली आहे. सद्यस्थितीत चालू असलेल्
हादगाव बु. जि.प.सर्कलच्या समृद्धीसाठी नखाते हे कुशल नेतृत्व.  वडी येथे विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी आ. विटेकर यांचे प्रतिपादन


परभणी, 30 डिसेंबर, (हिं.स.)। विकासाची जाण असलेले कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून वाल्मिकी अर्बन बँकेचे चेअरमन अनिलराव नखाते यांच्याकडे हादगाव बु जि.प.सर्कलमधील वडीसह सर्व गावांतील समस्या मार्गी लावण्याची जबाबदारी सोपवली आहे. सद्यस्थितीत चालू असलेल्या विकासकामांचा रथ असाच चालू ठेवण्यासाठी हादगाव बु. जि. सर्कलच्या समृद्धीसाठी कुशल नेतृत्व नखाते यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन आमदार राजेश विटेकर यांनी केले.

पाथरी तालुक्यातील वडी येथे स्थानिक विकास निधीतून वडर वस्ती २५ लक्ष रूपये च्या सभामंडपाचे भूमिपूजन, अहिल्याबाई होळकर सभागृहासमोरील पेव्हर ब्लॉक रस्त्याचे लोकार्पण आणि महादेव मंदिराजवळील टिन शेडचे काम आ. विटेकर यांच्या हस्ते सुरू झाले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी वाल्मिकी अर्बन बँकेचे चेअरमन अनिलराव नखाते, जि.प. माजी सभापती दादासाहेब टेंगसे, महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अजिंक्य नखाते,प. स.माजी सभापती राजेश ढगे, बाजार समीती संचालक विष्णु काळे, हादगाव बु चे सरपंच बिभीषण नखाते, प. स.माजी सभापती कुडलिकराव शिदे, हादगाव बु चेअरमन बाबासाहेब नखाते,हनुमान ढगे, बाबासाहेब चौरे, माजी सरपंच शिवाजीराव कुटे ,भगवान वडीकर, हरिभाऊ ताल्डे, सुग्रीव अण्णा बिक्कड, महादेव तोंडे, दत्ता महाराज ताल्डे,कैलास शिंदे, तुकाराम शिंदे, रामप्रसाद डुकरे, भाऊसाहेब डुकरे, धोडीराम डुकरे हे उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. विटेकर म्हणाले, अल्पावधीत हादगाव बु जि. प.सर्कलच्या सर्व गावातील रखडलेले शेत रस्ते,पाणंद रस्ते, विद्युत समस्या, अंतर्गत रस्ते या सारखी गावसमृद्धी करणारी विकासकामे अनिलराव नखाते यांच्या सुयोग्य नियोजनात सुरू आहेत. या भागाच्या विकासासाठी आमदार म्हणून निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी आ. विटेकर यांनी दिली.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, तरूण पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande