पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारांची गर्दी
पुणे, 30 डिसेंबर, (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या बाहेर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शक्तीप्रदर्शन केले. गेल्या सहा दिवसांत केवळ ४८ अर्ज दाखल झाले होते. त्
PMC news


पुणे, 30 डिसेंबर, (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या बाहेर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शक्तीप्रदर्शन केले. गेल्या सहा दिवसांत केवळ ४८ अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला. आज शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत.

महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयात ६९, नगर रस्ता-वडगाव शेरी ८८, कोथरूड-बावधन २४, औंध-बाणेर २०, शिवाजीनगर-घोले रस्ता १४, ढोले पाटील रस्ता ४७, हडपसर-मुंढवा ६३, वानवडी-रामटेकडी ४२, बिबवेवाडी ७२, भवानी पेठ ५९, कसबा-विश्रामबाग वाडा ३२, वारजे-कर्वेनगर ४८, सिंहगड रस्ता ४०, धनकवडी-सहकारनगर ५८, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात १८ अर्ज दाखल झाले आहेत.आज दिवसभरात १ हजार४४९ अर्जांची विक्री झाली असून, आतापर्यंत एकूण अर्ज विक्रीचा आकडा ११ हजारांच्या पुढे गेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande