
पुणे, 30 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींकडून मतदारांवर दबाव आणला जाऊ नये, तसेच निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी आतापर्यंत सुमारे पाच हजारांहून अधिक सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
शहरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी आणि आगामी धोरणांची माहिती देण्यासाठीआयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, अतिरिक्त आयुक्त संजय पाटील, मनोज पाटील, राजेश बनसोडे, तसेच पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव, कृषीकेश रावले, मिलिंद मोहिते, संभाजी कदम, राजलक्ष्मी शिवणकर, डॉ. राजकुमार शिंदे, सोमय मुंडे, विवेक मासाळ, संदीप भाजीभाकरे, चिलूमुला रजनीकांत आणि डॉ. सागर कवडे उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु