
नांदेड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। ग्राहकांचे हक्क व ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार 2 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दुपारी १ वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार असून, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष राहुल पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
कार्यक्रमात ग्राहक पंचायतचे संघटक ॲड. आनंद बळवंतराव कृष्णापूरकर, उपाध्यक्ष सायन्ना मठमवार व सहसचिव ॲड. दिपाली डोणगावकर हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सर्व ग्राहक व नागरिकांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis