
जळगाव, 30 डिसेंबर (हिं.स.)महापालिका निवडणुकीत जागा लढण्यावरून जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासोबत मतभेद झाल्याने राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी फूट पडली आहे.
जळगावचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपला पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने अजित पवार गटात खळबळ उडाली. महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिल्याचे यावर त्याला दुजारा दिला असून पक्ष कार्यालयात राजीनामा दिल्याचे सांगितलं.
दरम्यान महापालिका निवडणूक लढवून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये दुफळी वाद निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहेएकीकडे जळगाव महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उरलेला असतानाही सत्ताधारी महायुतीमधील (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाही. एकीकडे भाजप ५० जागांवर ठाम आहे, तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) २५ जागांहून कमी घेण्यास तयार नाही. या वादात राष्ट्रवादीसाठी जागा सोडणार कोण? असा प्रश्न निर्माण झाल्याने महायुतीचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर