रत्नागिरी : हिंदूंवरील अत्याचाराविरोधात संविधान सन्मान मंचाचे धरणे
रत्नागिरी, 30 डिसेंबर, (हिं. स.) : बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार, हत्या, जबरदस्तीने केलेले धर्मांतर व धार्मिक स्थळांची तोडफोड यांचा तीव्र निषेध करत संविधान सन्मान मंचाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. रत्नाग
हिंदूंवरील अत्याचाराविरोधात संविधान सन्मान मंचाचे धरणे


रत्नागिरी, 30 डिसेंबर, (हिं. स.) : बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार, हत्या, जबरदस्तीने केलेले धर्मांतर व धार्मिक स्थळांची तोडफोड यांचा तीव्र निषेध करत संविधान सन्मान मंचाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.

रत्नागिरीत बांग्लादेशी रहिवासी व रोहिंग्या मुसलमान आढळले असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना बांग्लादेशात पाठवून द्यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा संविधानिक मार्गाने हिंदू समाज आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.

संविधान सन्मान मंचाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. हिंदू समाज सक्षमपणे व संघटितपणे एकत्र उभा आहे. कट्टर पंथीय लोक सुसंस्कृत रत्नागिरीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. रत्नागिरीतील बांग्लादेशींना हटवले नाही, तर हिंदू समाज सांविधानिक मार्गाने जे जे करता येईल, ते करणार आहोत. रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आढळत आहेत. अनेक प्रकारचे जिहाद होत आहेत. धर्मांतर होत आहे. हे आपण सहन करणार आहोत का? सनातन हिंदू समाज एकत्र आणि सक्षम आहे. जिहाद होत असतील तर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी त्याला आळा घालावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भारत सरकारने बांग्लादेश सरकारवर कडक भूमिका घ्यावी, आर्थिक व अन्य मदत थांबवावी तसेच तेथील हिंदू बांधवांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय भारतात बेकायदेशीररीत्या घुसलेल्या बांग्लादेशी व रोहिंग्या मुस्लिमांची सखोल चौकशी करून त्यांना देशाबाहेर हाकलण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande