
बीड, 30 डिसेंबर (हिं.स.)।
महसूल आणि पोलीस प्रशासनाने मुरूम वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडून तहसील कार्यालयात आणून लावला होता. मात्र अज्ञात व्यक्तीने बनावट चावीने ट्रॉलीसह ट्रॅक्टर पळवून नेल्याचे उघडकीस आले. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे. अशी माहिती मिळाली आहे
मिळालेल्या माहितीनुसार
केज - कळंब रस्त्यावरून मुरूम घेऊन एक ट्रॅक्टर जात असल्याची माहिती मिळताच महसूल कर्मचाऱ्यांनी पोलिसांची मदत घेत सुमारास पकडला होता. त्यानंतर तो ट्रॅक्टर ट्रॉलीसह आणून तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून लावला होता. ही कारवाई झाल्याचे समजताच रात्री अंधाराचा फायदा घेऊन बनावट चावीचा वापर करीत तहसील
कार्यालयाच्या परिसरातून उभा असलेला ट्रॅक्टर व ट्रॉली तिथून पळवून नेला. सकाळी महसूल कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, प्रशासनाच्या ताब्यातून वाहन पळवून नेल्यामुळे पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, ट्रॅक्टर चोरणारा आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे सरकारी मालमत्तेच्या आणि जप्त केलेल्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis