बनावट पॅनकार्ड व आधारकार्डाद्वारे प्लॉटची परस्पर विक्री; वकिलासह सात जणांविरुद्ध गुन्हा
नाशिक, 30 डिसेंबर, (हिं.स.)। बनावट पॅनकार्ड आधार कार्डाचा वापर करून तोतया मालक उभे करून प्लॉटची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या एका वकिलासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संतोष संजी
बनावट पॅनकार्ड व आधारकार्डाद्वारे प्लॉटची परस्पर विक्री; वकिलासह सात जणांविरुद्ध गुन्हा


नाशिक, 30 डिसेंबर, (हिं.स.)। बनावट पॅनकार्ड आधार कार्डाचा वापर करून तोतया मालक उभे करून प्लॉटची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या एका वकिलासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संतोष संजीवा हेगडे (रा. महात्मानगर, सातपूर) हे उद्योजक आहेत. आरोपी रितेश रमेश संसारे (रा. वडगाव पंगू, ता. जि. नाशिक), एक अनोळखी पुरुष व महिला, भीमराव कोंडीबा वाघमारे, मुकेश जाधव, रवींद्र हरिदास अढांगळे, शरद भास्कर मुठेकर व अॅड. कपिल अरविंद पाठक (सर्व रा. नाशिक) यांनी संगनमत करून फिर्यादी हेगडे व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या प्लॉटची फिर्यादीकडून कुठल्याही प्रकारची

परवानगी न घेता बनावट पॅनकार्ड व आधारकार्डाचा वापर करून व बनावट पुरुष व महिला उभ्या करून त्यांच्या सह्या व अंगठे घेऊन प्लॉटची परस्पर विक्री करून फसवणूक केली.

हा प्रकार दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी चेतनानगर परिसरात घडला. ही बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी हेगडेयांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुंदे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande