
नांदेड, 30 डिसेंबर (हिं.स.)शहरातील रवीनगर भागात नांदेड ग्रामीण पोलिसांनी रविवारी धाड मारून नायलॉन मांजा विक्री करणान्य एकाला पकडले त्याच्याकडून २८ हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणात गुन्हा नोंदविला.मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्याची परंपरा आहे. परंतु पतंग उडविण्यासाठी धोकादायक असलेल्या २८ हजार रुपयांचा नायलॉन मांजा केला जप्त नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईसाठी पोलिस ठाणे निहाय पथके नियुक्त केली आहेत. रवीनगर भागात राज सुरजसिंग ठाकूर याच्या दुकानावर छापा मारून २८ हजार रुपयांचा नायलॉन मांजा पथकाने जप्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis