पुणे - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) च्या वाट्याला ९ जागा
पुणे, 30 डिसेंबर, (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) यांची युती असून पक्षाला पुणे महानगरपालिका निवडणुकीत ९ जागा मिळाल्याची माहिती शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी दिली आहे. प्रभा
पुणे - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) च्या वाट्याला ९ जागा


पुणे, 30 डिसेंबर, (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) यांची युती असून पक्षाला पुणे महानगरपालिका निवडणुकीत ९ जागा मिळाल्याची माहिती शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी दिली आहे.

प्रभाग क्रमांक १ मध्ये अश्विनी राहुल भंडारे, प्रभाग २ अ - रेणुका चलवादी, प्रभाग २ ब - सुधीर वाघमोडे, प्रभाग ६ संतोष आरडे, प्रभाग ७ निशा मानवतकर, प्रभाग ८ परशुराम वाडेकर, प्रभाग १३ निलेश आल्हाट, प्रभाग १४ हिमाली कांबळे आणि प्रभाग २२ मधून मृणाली बापू कांबळे यांना उमेदवारी मिळाली आहे.

पुढे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भाजपकडे आम्ही १५ जागांची मागणी केली होती, वाटाघाटी मध्ये भाजपाने आम्हाला ९ जागा दिल्या आहेत. यामध्ये ६ पुरूष आणि ३ महिलांचा समावेश असून सामजिक संतुलन राखण्यात आले आहे, आरपीआयच्या उमेदवारांमध्ये ५ बौद्ध, ३ मातंग आणि एक धनगर उमेदवार आहे. आम्ही युती म्हणून महापालिका निवडणुका लढवणार असून पुणे महापालिकेवर भाजप - आरपीआयची सत्ता येईल असा विश्वास शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, सरचिटणीस शाम सदाफुले, मोहन जगताप, महिला अध्यक्ष हिमाली कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande