
लातूर, 31 डिसेंबर (हिं.स.)।
श्रीगुरु हावगीस्वामी यात्रा महोत्सवानिमित्त शिवनाम सप्ताह, सप्तकोटी शिवपंचाक्षर जपयज्ञ व परमरहस्य ग्रंथाचे पारायणास श्री गुरु हावगीस्वामी मठ येथे सोमवार दि. 29डिसेंबर पासुन प्रारंभ झाला आहेअसुन याप्रसंगी श्रीगुरु दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न झाले.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने श्रीगुरु हावगीस्वामी मठाचे मठाधिश डॉ. शंभुलिग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली
शिवनाम सप्ताह, सप्तकोटी शिवपंचाक्षरी जपयज्ञ परमरहस्य ग्रंथाचे परायणास प्रारंभ झाला आहे. प्रथम दिवशी प्रा.डाॅ मल्लेश झुंगास्वामी, शि.भ.प. उध्दव महाराज हैबतपुरे, शि.भ.प. शिवराज नावंदे गुरी, बाबुराव पांढरे, राम मोतीपवळे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री गुरु हावगीस्वामी मठ संस्थानच्यावतीने सन2026 च्या सण व उत्सवाच्या माहितीपुर्ण श्रीगुरु दनदर्शिकीचे प्रकाशन डाॅ शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांचे हस्ते संपन्न झाले.
4 ते 5 प्रवचन शिवराज महाराज हाळीकर,ओमकार मिरजगावे ,अशोक पाटिल शेळगाव,दैवशाला हळीघोंगडे,सुर्यकांत पाटिल,सौ.लक्ष्मीबाई श्रीमंडळे,सौ.चंद्रकलाबाई आठाणे,सौ.अनिता हैबतपुरे,सौ.रुपावती बिरादार
आदी सहभागी होणार आहेत.
संध्याकाळी 6 ते7
शिवपाठ, सांस्कृतीक कार्यक्रम रात्री 9 ते 12 शिवकिर्तन व शिवजागर आदि कार्यक्रमास प्रारंभ झाला असून या यात्रा महोत्सव निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमास महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकातील भाविक भक्त सहभागी झाले आहेत आहे.
मंगळवार दि.30 डिसेंबर रोजी शि.भ.प.किर्तीताई महाराज हिरेमठ लातूर, बुधवार दि. 31 रोजी शि.भ.प. संगमेश्वर बिरादार (वलांडी), गुरुवार दि.1 जानेवारी 2026 रोजी शि.भ.प.अमोल महाराज बनवसकर ,शुक्रवार दि. 2जानेवारी रोजी शि.भ.प.कैलास महाराज जामकर,शनिवार दि.3 रोजी शिवशरण महाराज रटकलकर गुरुजी,रविवार दि.4जानेवारी 2026 रोजी टाळआरती किर्तन शि.भ.प बन गुरुजी महाराज उदगीर तर रात्री 9 ते 12 शि.भ.प.मन्मथप्पा डांगे महाराज उस्माननगर यांचे किर्तन होणार आहे.
रविवार दि.4 जानेवारी 2026 जानेवारी रोजी परमरहस्य ग्रंथ व सप्तकोटी शिवपंचाक्षर महामंत्र जपाची सांगता होणार असुन सकाळी 11 वाजता शहरातुन भव्य कलश शोभायात्रा निघुन दुपारी 3 वाजता श्रीगुरु हावगीस्वामी मठात महामंगल आरती होणार आहे. तर रात्री 2 वाजता श्रीची पालखी मिरवणुक निघुन सोमवार दि.5
जानेवारी रोजीचे पहाटे ५ वाजता अग्गीचा कार्यक्रम होणार आहे.सकाळी ठिक 10.30 वाजता श्री ष.ब्र. 108 सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांचे महाप्रसादाचे किर्तन होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis