
नवी दिल्ली, 31 डिसेंबर (हिं.स.) - विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्जनशीलता, भाषा कौशल्ये आणि भावनिक अभिव्यक्ती बळकट करण्यासाठी भारतीय पोस्टने/ टपाल खात्याने त्यांच्या प्रमुख ढाई आखर राष्ट्रीय पत्रलेखन मोहिमेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2026 पर्यंत वाढवली आहे.
लेटर टू माय रोल मॉडेल या संकल्पनेवर असलेली ही मोहीम इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही स्थानिक भाषेतील हस्तलिखित नोंदी स्वीकारते. लिफाफा श्रेणी (ईसी /EC) साठी शब्द मर्यादा 1000 शब्द आणि इनलँड लेटर कार्ड श्रेणी (ILC/आयएलसी) साठी 500 शब्द आहे.
विद्यार्थी 18 वर्षांपर्यंत आणि 18 वर्षांवरील दोन वयोगटात एन्व्हलप आणि आयएलसी फॉरमॅटमध्ये सहभागी होऊ शकतात. विजेत्यांना सर्कल स्तरावर (महाराष्ट्र आणि गोवा) 25,000, 10,000 आणि 5,000आणि राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक श्रेणीत 50,000, 25,000 आणि 10,000 रोख बक्षिसे प्रदान केली जातील.
सहभागींनी वयाची घोषणा समाविष्ट करणे आवश्यक आहे: मी प्रमाणित करतो की 01-01-2025रोजी माझे वय 18 वर्षांपेक्षा कमी/अधिक आहे.
शाळा पत्रे गोळा करू शकतात आणि ती जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये एकत्रितपणे सादर करू शकतात. पत्ता असा आहे: संचालक, मुंबई जीपीओ, मुंबई - 400001 आहे. अपवादात्मक सहभाग असलेल्या निवडक शाळांना मंडळ-स्तरीय मान्यता मिळू शकते.
गोवा येथील वरिष्ठ पोस्ट ऑफिस अधीक्षक शिक्षक आणि पालकांना विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी आणि पत्रलेखनाच्या पारंपारिक कलेला पुनरुज्जीवित करण्यास मदत करण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन करतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी