नववर्ष प्रण - सुरक्षित अन्न' विशेष तपासणी मोहीम सुरू
अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.) नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत जिल्ह्यात ''नववर्ष प्रण - सुरक्षित अन्न'' विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. हे विशेष अभियान 24 डि
नववर्ष प्रण - सुरक्षित अन्न' विशेष तपासणी मोहीम सुरू


अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.)

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत जिल्ह्यात 'नववर्ष प्रण - सुरक्षित अन्न' विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. हे विशेष अभियान 24 डिसेंबरपासून सुरू झाले असून 10 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील हॉटेल, उपहारगृहे, क्लब हाऊस आणि रिसॉर्ट्स इत्यादी आस्थापनांची कसून तपासणी केली जाणार आहे. तपासणीसोबतच संबंधित आस्थापना चालकांसाठी सुरक्षित अन्नाबाबतच्या सवयी आणि नियमांबाबत सभा व कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी सर्व अन्न व्यावसायिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने केले आहे. या मोहिमेमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande