
अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.)
राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जागोजागी सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत; मात्र यातील अनेक कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. परिणामी, या यंत्रणेसाठी करण्यात आलेला लाखों रुपयांचा खर्च अक्षरश वाया जात असल्याचे चित्र असून, कॅमेऱ्यांच्या देखभाल त तांत्रिक दुरुस्तीबाबत संबंधित यंत्रणांचे दुर्लक्षस्पष्टपणे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गामुळे प्रवास वेगवान झाला असला, तरी विविध तांत्रिक व व्यवस्थापकीय त्रुटींमुळे वाहनचालकांच्या समस्या अद्यापही कायम आहेत. सीसी कॅमेरे कार्यान्वित नसल्याने वाहतूक अपघातांवर नियंत्रण, नजर, तसेच गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्याचा उद्देश अपूर्ण राहात असून, महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरआला आहे तर महामार्गावरील काही ठिकाणी स्पिड डिस्प्ले सुद्धा बंद अवस्थेत आहेत.
सीसी कॅमेऱ्यांची पाहणी
अमरावती विभागाच्या हद्दीतील कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात आली असून, सर्व कॅमेरे सुस्थितीत सुरू आहेत. काही तांत्रिक अडचण आल्यास लवकर सोडण्यात येत आहे, अशी माहिती अमरावती येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापक जवादे यांनी दिली.
दुरुस्तीचे कंत्राट; पण कामात हलगर्जी !
सीसी कॅमेऱ्यासंदर्भात कुठलीही तांत्रिक अडचण आल्यास ते दुरुस्ती करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने कंत्राट दिले आहे; मात्र या कामात हलगर्जी होत असल्याचा आरोप काही प्रवाशांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी