रोगमुक्त आरोग्यासाठी योग आवश्यक : आ. कल्याणकर
नांदेड, 8 डिसेंबर (हिं.स.)। नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक विकासाची आणि भौतिक विकासाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. ती सतत सुरूच राहतील मात्र आता जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी काम करण्यात येणार आहे. यासाठी रोगमुक्त संगीतमय
रोगमुक्त आरोग्यासाठी योग आवश्यक : आ. कल्याणकर


नांदेड, 8 डिसेंबर (हिं.स.)।

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक विकासाची आणि भौतिक विकासाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. ती सतत सुरूच राहतील मात्र आता जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी काम करण्यात येणार आहे. यासाठी रोगमुक्त संगीतमय योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे . या रोगमुक्त योग शिबिरातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे आरोग्य अधिक चांगले ठेवण्याचा आमचा मानस आहे . त्यासाठी या आरोग्य शिबिराचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. बालाजी कल्याणकर यांनी केले आहे.

भक्ती लॉन्स येथे योग गुरु नांदेड भूषण सिताराम सोनटक्के यांच्या सानिध्यात सात दिवसीय मोफत रोगमुक्त संगीतमय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सात दिवशीय योग शिबिराचे उद्घाटन आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ते बोलत होते.

योग साधक आणि उपस्थितांना आशीर्वाद देण्यासाठी श्री. महंत 108 जीवनदासजी बाबाजी , हनुमान गड मठ संस्थान महंत श्री.गरुडदास त्यागी महाराज , गोविंद गुरुजी महाराज , हनुमान गडचे मुख्य पुजारी अर्जुन महाराज यांची उपस्थिती होती .

यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्यासह आ. आनंदराव पाटील बोंढारकर , सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर ,सह संपर्कप्रमुख दर्शन सिंग सिद्धू, शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे , जिल्हाप्रमुख विनय गिरडे , सामाजिक कार्यकर्ते जयंत वाकोडकर , सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम , आदींची उपस्थिती होती .

या शिबिराचे आयोजन एकनाथ कल्याणकर , सुहास बालाजी कल्याणकर , योगेश उमेशजी मुंडे यांनी केले .

योग शिबिरात सहभागी झालेल्या योग साधकांशी संवाद साधताना आ. बालाजी कल्याणकर म्हणाले की , नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत . आगामी काळातही नांदेड शहराचा भौतिक विकास मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. परंतु याचवेळी आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी योग शिबिर आयोजित करणे अत्यावश्यक होते . या योग शिबिराच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दैनंदिन जीवनात व्यायाम करण्याची सवय लागावी , योग करण्याची सवय लागावी , यातून आपले आरोग्य तंदुरुस्त राहील. आपला मानसिक विकास होईल. यासोबतच आर्थिक उन्नतीचाही मार्ग सापडेल त्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आठ दिवशीय संगीतमय योग शिबिराचा आपण लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. आनंदराव पाटील बोंढारकर म्हणाले की, विकासाची कामे करत असताना संयोजकांनी येथे मोफत योग शिबिर आयोजित करून खऱ्या अर्थाने जनतेच्या सार्वजनिक आरोग्याची काळजी घेतली आहे . भौतिक सुखापेक्षा शारीरिक आरोग्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे . योग नाही तर सुखी आणि निरोगी आरोग्य नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनात निरोगी राहण्यासाठी आपण किमान एक तास स्वतःच्या आरोग्यासाठी द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande