ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट २०२४: शाहरुख खानला मागे टाकत विराट कोहलीने बनला सर्वात मोठा ब्रँड
मुंबई, 26 सप्टेंबर (हिं.स.)।भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत अव्वलस्थानी पोहोचला आहे. नुकतीच प्रसिद्ध झालेल्या ‘सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्ट 2024’ नुसार, विराट कोहलीने बॉ
ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट २०२४:


मुंबई, 26 सप्टेंबर (हिं.स.)।भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत अव्वलस्थानी पोहोचला आहे. नुकतीच प्रसिद्ध झालेल्या ‘सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्ट 2024’ नुसार, विराट कोहलीने बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याला मागे टाकले आहे. या अहवालानुसार, कोहलीची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 2,209 कोटी रुपये असल्याचे सांगितले गेले आहे.

क्रोल संस्थेच्या ‘सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्ट 2024’ मध्ये विराट कोहलीने पहिले स्थान पटकावले आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू 231.1 दशलक्ष डॉलर (सुमारे 2,050 कोटी रुपये) एवढी असून त्याने शाहरुख खानला मागे टाकले आहे.तर दुसऱ्या क्रमांकावर रणवीर सिंग आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 1,416.81 कोटी रुपये आहे. शाहरुख खान तिसऱ्या स्थानावर असून त्याची ब्रँड व्हॅल्यू 21% वाढून 1,209.31 कोटी रुपये झाली आहे. दरम्यान, विराट कोहलीने या वर्षी मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

महिला सेलेब्रिटींच्या यादीत आलिया भट्टने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.तिची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 782 कोटी रुपये इतकी आहे. जाहिरात आणि चित्रपटांमधील तिच्या सातत्याने होणाऱ्या उपस्थितीमुळे ती कंपन्यांची पहिली पसंती ठरत आहे.

क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडुलकर यांनी देखील टॉप-5 मध्ये पुनरागमन केले असून त्यांची ब्रँड व्हॅल्यू 931.26 कोटी रुपये झाली आहे. ही वाढ नवीन जाहिरात करारांमुळे झाली आहे. यानंतर अभिनेत्री कृती सेनन 19व्या स्थानावर, तमन्ना भाटिया 21व्या स्थानावर, जसप्रीत बुमराह 22व्या स्थानावर, अनन्या पांडे हि पहिल्यांदाच या यादीत 25व्या स्थानावर आहे. तिची ब्रँड व्हॅल्यू 35.2 मिलियन डॉलर झाली आहे.

आजच्या काळात एखाद्या सेलेब्रिटीची ब्रँड व्हॅल्यू ही त्याच्या लोकप्रियतेचे, मार्केटिंग क्षमतेचे आणि जाहिरातींवर होणाऱ्या प्रभावाचे प्रतीक मानली जाते. कंपन्या अशाच चेहऱ्यांवर विश्वास ठेवतात, ज्यांची ब्रँड व्हॅल्यू मजबूत असते. विराट कोहली आणि शाहरुख खान हे दोघेही यामध्ये कायम अग्रस्थानी आहेत.

अहवालानुसार, भारतातील टॉप 25 सेलेब्रिटींची एकूण ब्रँड व्हॅल्यू सुमारे 2 लाख कोटी रुपये आहे. यामध्ये खेळ आणि मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.विराट कोहली हा त्याचा खेळातील सातत्य आणि फिटनेसमुळे ब्रँड्सची पहिली पसंती ठरत आहे. तर शाहरुख खान हा त्याच्या चित्रपटांमधून आणि जाहिरातीतून त्याचा प्रभाव अजूनही अब्जावधी लोकांवर आहे. एकूणच, विराट कोहलीने केवळ क्रिकेटच्या मैदानावर नव्हे, तर जाहिरात आणि ब्रँड व्हॅल्यूच्या मैदानातही बाजी मारली आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande