हिरे महाविद्यालयाला कबड्डी मध्ये सलग चौथ्यांदा अजिंक्यपद
नाशिक, 26 सप्टेंबर (हिं.स.)। : १९ वर्षांच्या आतील कबड्डी स्पर्धेत येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या संघाने सलग चौथ्या वर्षी विजय संपादन करून विजयाची परंपरा कायम राखली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित १९ वर्षांच्या आतील कबड्डी पुरुष
हिरे महाविद्यालयाला कबड्डी मध्ये सलग चौथ्यांदा अजिंक्यपद


नाशिक, 26 सप्टेंबर (हिं.स.)। : १९ वर्षांच्या आतील कबड्डी स्पर्धेत येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या संघाने सलग चौथ्या वर्षी विजय संपादन करून विजयाची परंपरा कायम राखली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित १९ वर्षांच्या आतील कबड्डी पुरुष स्पर्धा नुकत्याच मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात पार पडल्या. | यात एकूण १६ संघांनी स्पर्धेत सहभाग

नोंदवला होता. अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या केटीएचएम महाविद्यालयाला ४ विरुद्ध २४ अशा फरकाने धूळ चारत हिरे महाविद्यालयाच्या क्रीडापटूंनी दणदणीत विजय मिळवत विजयाचे चौथे वषे साजरे केले.क्रीडा संचालक प्रा. किशोर राजगुरू, क्रीडा संचालक प्रा. डॉ. दिनेश कराड यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे सरचिटणीस डॉ. प्रशांत हिरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande