आशिया कप : सूर्यकुमार यादव वर दंडात्मक कारवाई
दुबई, 27 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या ३० टक्के दंड ठोठावला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पण भारतीय क्र
सूर्यकुमार यादव


दुबई, 27 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या ३० टक्के दंड ठोठावला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जागतिक प्रशासकीय मंडळाच्या निर्णयाविरुद्ध अपील केले आहे. भारतीय कर्णधाराने पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात भारताचा विजय भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केला होता. त्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसोबत एकता देखील व्यक्त केली होती. ज्यावर पाकिस्तानने आक्षेप घेतला होता.

१४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर सात दिवसांच्या आत पीसीबीने तक्रार दाखल केली. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यात पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. भारतीय संघाचा विजय भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केला होता. त्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसोबत एकता देखील व्यक्त केली होती.

सूर्यकुमार आयसीसीच्या सुनावणीला उपस्थित होता. त्याच्यासोबत बीसीसीआयचे सीओओ आणि क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर होते. रिचर्डसन यांनी त्याला समजावून सांगितले की, त्याने असे कोणतेही भाष्य करू नये जे राजकीय स्वरूपाचे असेल. दंडाचे स्वरूप अद्याप माहित नाही. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला त्याच्या सामना शुल्काच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला.

सूर्यकुमार पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानतर म्हणाल होता की, मला काहीतरी सांगायचे आहे आणि हीच योग्य वेळ आहे. आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांसोबत उभे आहोत आणि त्यांच्यासोबत आमची एकता व्यक्त करतो. मी हा विजय आमच्या सर्व सशस्त्र दलांना समर्पित करतो ज्यांनी प्रचंड शौर्य दाखवले आहे. आशा आहे की, ते आम्हाला प्रेरणा देत राहतील आणि जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांना आनंद देण्याची संधी मिळेल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या तक्रारीवर सुनावणी केली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ आणि फलंदाज साहिबजादा फरहान यांच्याविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली. आयसीसीने भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान हरिस रौफला अपशब्द आणि आक्षेपार्ह हावभाव वापरल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्याच्या सामना शुल्काच्या 30 टक्के दंड ठोठावला. साहिबजादा फरहानला त्याच्या गनफायर सेलिब्रेशन केल्याबद्दल कडक इशाराही देण्यात आला. मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी टीम हॉटेलमध्ये सुनावणी पूर्ण केली. सुनावणीनंतर रौफला दंड ठोठावण्यात आला. तर फरहानला इशारा देऊन सोडून देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande