ग्लोबल चेस लीग : डी. गुकेश आणि अर्जुन एरिगाईसी पीबीजी अलास्का नाईट्सकडून खेळणार
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर (हिं.स.)वर्ल्ड चॅम्पियन डी. गुकेश आणि अर्जुन एरिगाईसी सारखे अव्वल भारतीय ग्रँडमास्टर आगामी ग्लोबल चेस लीगमध्ये पीबीजी अलास्का नाईट्सचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पीबीजी अलास्का नाईट्स फ्रँचायझीने प्लेअर ड्राफ्टमध्ये या दोन अव्वल
डी गुकेश


नवी दिल्ली, 27 सप्टेंबर (हिं.स.)वर्ल्ड चॅम्पियन डी. गुकेश आणि अर्जुन एरिगाईसी सारखे अव्वल भारतीय ग्रँडमास्टर आगामी ग्लोबल चेस लीगमध्ये पीबीजी अलास्का नाईट्सचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पीबीजी अलास्का नाईट्स फ्रँचायझीने प्लेअर ड्राफ्टमध्ये या दोन अव्वल भारतीय बुद्धीबळपटूंना करारबद्ध करण्यात यश मिळवले आहे.

टेक महिंद्रा आणि एफआयडीई यांच्या संयुक्त उपक्रमाने सुरू केलेल्या सहा संघांच्या जीसीएलचा तिसरा हंगाम १३ ते २४ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे. अल्पाइन एसजी पायपर्सने अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाशी करार केला आहे. पीबीजी अलास्का नाईट्सने गुकेशला त्यांच्या संघात सहभागी करण्यासाठी इतर फ्रँचायझींना मागे टाकले. पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद गंगा ग्रँडमास्टर्स संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

वर्ल्ड नंबर ५ बुद्धीबळपटू एरिगाईसीसाठी तीन संघांनी जोरदार बोली लावली होती. अखेर पीबीजी अलास्का नाईट्सने यात बाजी मारलेली पहायाला मिळाली. यूएस ग्रँडमास्टर वेस्ली सो यांची अपग्रेड मुंबा मास्टर्सने निवड केली. २० वर्षीय व्हिन्सेंट केमरल आपल्या संघात घेत गंगा ग्रँडमास्टर्सने आपला संघ आणखी मजबूत केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande