भारत 18 वर्षांपासून पाकिस्तानला अंतिम फेरीत पराभूत करण्यात अपयशी
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर (हिं.स.) - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना दुबई येथे रंगणार आहे. सध्याच्या स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्याची ही तिसरी वेळ असेल. यापूर्वी भारताने आशिया कपच्या साखळी सामन्यात आणि सुपर फोरमध्ये
भारत आणिपाकिस्तान संघ


नवी दिल्ली, 27 सप्टेंबर (हिं.स.) - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना दुबई येथे रंगणार आहे. सध्याच्या स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्याची ही तिसरी वेळ असेल. यापूर्वी भारताने आशिया कपच्या साखळी सामन्यात आणि सुपर फोरमध्ये आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले होते. आता ते पाकिस्तान विरुद्ध विजयाची हॅटट्रिक साकारण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. भारतासाठी हे आव्हान सोपे नाही. कारण पाकिस्तान विरुद्ध विजेतेपदाच्या सामन्यांमध्ये भारताची कामगिरी खराब आहे.

पाकिस्तानने बांगलादेशला ११ धावांनी पराभूत २०२५ च्या आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता त्यांचा सामना भारताशी विजेतेपदाच्या सामन्यात होणार आहे. आशिया कपची सुरुवात १९८४ मध्ये झाली. २०१६ मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदाच टी-२० स्वरूपात खेळवण्यात आली होती. भारतीय संघाने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे. भारताने आतापर्यंत आठ वेळा आशिया कप ट्रॉफी उंचावली आहे. दरम्यान, पाकिस्तानने फक्त दोनदाच विजेतेपद जिंकले आहे, तर श्रीलंकेने सहा वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे. विशेष म्हणजे आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पहिल्यांदा आमने-सामने येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एखाद्या स्पर्धेच्या अथवा तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येण्याची ही १३ वी वेळ आहे. मागील १२ सामन्यांमध्ये पाकिस्तानने 8 वेळा विजय मिळवला आहे. तर भारताला केवळ चार वेळा पाकिस्तानला पराभूत करण्यात यश आलं आहे. दोन्ही संघ शेवटच्या वेळी २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत विजेतेपदासाठी भिडले होते. जिथे पाकिस्तानने विजय मिळवला होता. भारताला पाकिस्तानवर शेवटचा विजय २००७ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मिळवता आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande