आशिया कपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाला दुखापतींचा विळखा
अबुधाबी, 27 सप्टेंबर (हिं.स.)आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांना दुखापत झाली आहे. पंड्याचा सहभाग अनिश्चित आहे. त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास आहे. तिलक वर्माच्या पायाला दुखापत झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या
भारतीय क्रिकेट संघ


अबुधाबी, 27 सप्टेंबर (हिं.स.)आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांना दुखापत झाली आहे. पंड्याचा सहभाग अनिश्चित आहे. त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास आहे. तिलक वर्माच्या पायाला दुखापत झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सुपर फोर सामन्यात दोघेही जखमी झाले होते. भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हार्दिकच्या दुखापतीचा आढावा घेतला जाईल. त्यांनी असेही सांगितले की, अभिषेक शर्माला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला होता. पण आता तो बरा आहे.

भारताने श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. भारताला ३ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, जे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या चेंडूवर साध्य केले.हार्दिक पंड्या या आशिया कपमध्ये भारतीय संघासाठी नवीन चेंडूने गोलंदाजी करतो. त्याने जवळजवळ प्रत्येक सामन्यात पहिले षटक टाकले आहे. हार्दिकने श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात पहिले षटकही टाकले. या षटकात त्याने कुसल मेंडिसची महत्त्वाची विकेटही घेतली. मात्र, त्यानंतर संपूर्ण सामन्यात हार्दिकने एकही षटक टाकले नाही. श्रीलंकेच्या फलंदाजांनी त्यांची स्फोटक फलंदाजी सुरू ठेवली. पण कर्णधार सूर्यकुमार यादवने हार्दिकची जागा घेतली नाही.श्रीलंकेच्या डावातील पहिले षटक टाकल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी रिंकू सिंग क्षेत्ररक्षणासाठी आला. त्यानंतर हार्दिक परतला नाही आणि म्हणूनच रिंकूने सुपर ओव्हरमध्येही क्षेत्ररक्षण केले आणि झेल घेतला.

श्रीलंकेच्या डावादरम्यान तिलक वर्मालाही मैदानाबाहेर जावे लागले. १० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूनंतर अभिषेक बाहेर गेला. १८ व्या षटकात तिलक वर्माला दुखापत झाली. अक्षर पटेलच्या चेंडूवर दासुन शनाकाने मिड-विकेटवर षटकार मारला. तिलक वर्मा उंच उडी मारून चेंडू रोखण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचा पाय दुखावला होता. तो नीट चालत नव्हता. तो मैदानाबाहेर गेला आणि शिवम दुबे क्षेत्ररक्षणासाठी आला.

भारती गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल म्हणाले की, रविवारी दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या आशिया कपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ कोणतेही सराव सत्र आयोजित करणार नाही. क्रिकेटपटूंना तंदुरुस्त आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी स्मार्ट रणनीती अवलंबल्या जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande