सौदी प्रो लीग : रोनाल्डोच्या अल नसरन संघाने अल इत्तिहादला २-० ने केले पराभूत
रियाद, २७ सप्टेंबर (हिं.स.) : सौदी प्रो लीगच्या विजेतेपदाच्या लढतीत अल नसरने गतविजेत्या अल इत्तिहादचा २-० ने पराभव केला. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि सादियो मानेने गोल करत आपल्या संघाच्या विजयात निर्णयाक भूमिका बजावली. या विजयासह अल नसरने ४ सामन्यांत १२
क्रिस्टियानो रोनाल्डो


रियाद, २७ सप्टेंबर (हिं.स.) : सौदी प्रो लीगच्या विजेतेपदाच्या लढतीत अल नसरने गतविजेत्या अल इत्तिहादचा २-० ने पराभव केला. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि सादियो मानेने गोल करत आपल्या संघाच्या विजयात निर्णयाक भूमिका बजावली. या विजयासह अल नसरने ४ सामन्यांत १२ गुणांसह गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर अल इत्तिहाद ९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

किंग अब्दुल्ला स्पोर्ट्स सिटी स्टेडियमवर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना अल इत्तिहाद सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसला. तर अल नसरने खेळावर आपले वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. आणि ९व्या मिनिटाला किंग्सले कोमनने उजव्या विंगमधून एक शानदार क्रॉस दिला. धावत असताना मानेने बॅक पोस्टवर व्हॉली मारून अल नसरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. १४ व्या मिनिटाला कोमनच्या क्रॉसवरून रोनाल्डोने हेडर चुकवला. पण ३५ व्या मिनिटाला त्याने त्याची भरपाई केली. यावेळी मानेने क्रॉस दिला आणि रोनाल्डोने अचूक हेडरने पासमध्ये रूपांतर करून संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.करीम बेंझेमाने स्टीवन बर्गेविनला अनेक वेळा चेंडू पास केला, परंतु तो संधींचा फायदा घेऊ शकला नाही.

दुसऱ्या हाफमध्ये अल नासरने आपली आक्रमणे सुरूच ठेवली होती. जोआओ फेलिक्सला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. पण तो अपयशी ठरला. ३९ व्या मिनिटाला मानेच्या क्रॉसवरून मारलेला त्याचा शॉट बारवरून गेला. ५८ व्या मिनिटाला नवाफ बौशालने ओपन गोलवर रोनाल्डोला पास दिला. पण पोर्तुगीज स्टारने चेंडू बारवरून मारला. ही सामन्यातील सर्वात सोपी आणि मोठी संधी होती. तरीही अल नासरने त्यांची दोन गोलची आघाडी कायम ठेवली आणि विजय मिळवला. अल इत्तिहादची घरच्या मैदानावर १९ सामन्यांची विजयी मालिकाही या पराभवाने संपुष्टात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande