आयसीसीची महिला विश्वचषक २०२५ साठी समालोचक पॅनेलची घोषणा
नवी दिल्ली, २८ सप्टेंबर (हिं.स.): आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ साठी समालोचकांच्या पॅनेलची घोषणा केली आहे. या समालोचक पॅनेलमध्ये दोन माजी भारतीय कर्णधारांसह प्रमुख महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. दिग्गज महिला क्रिक
मिथाली राज आणि दिनेश कार्तिक


नवी दिल्ली, २८ सप्टेंबर (हिं.स.): आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ साठी समालोचकांच्या पॅनेलची घोषणा केली आहे. या समालोचक पॅनेलमध्ये दोन माजी भारतीय कर्णधारांसह प्रमुख महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. दिग्गज महिला क्रिकेटपटू त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांना मोहित करणार आहेत.

समालोचक पॅनेलमध्ये माजी विश्वचषक विजेत्या मेल जोन्स, इसा गुहा, स्टेसी-अ‍ॅन किंग आणि ज्युलिया प्राइस यांच्यासह भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार मिताली राज, अंजुम चोप्रा आणि पाकिस्तानच्या माजी कर्णधार सना मीर यांचा समावेश आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेन, ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच, वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्रॅथवेट, भारताचा दिनेश कार्तिक, न्यूझीलंडचा केटी मार्टिन, इयान बिशप, नताशा फॅरंट, एमपुमेलियो एमबांगवा आणि रसेल अर्नोल्ड यांचा समावेश आहे. पॅनेलमध्ये अनुभवी प्रसारक नताली जर्मनोस, ऍलन विल्किन्स आणि कॅस नायडू, उदयोन्मुख प्रसारक रौनक कपूर आणि जतिन सप्रू यांचा समावेश आहे.

मिताली राजने २०२५ च्या विश्वचषकाचे वर्णन मुलींच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देणारी स्पर्धा म्हणून केले. मिताली राज म्हणाली की, भारत आणि श्रीलंकेत महिला विश्वचषक होत आहे हे पाहणे अत्यंत समाधानकारक आहे. हा केवळ जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा उत्सव साजरा करण्याबद्दल नाही तर क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींच्या नवीन पिढीला प्रेरणा देण्याबद्दल देखील आहे. एक खेळाडू म्हणून या प्रवासाचा भाग असल्याने, ती आता कॉमेंट्री बॉक्समधून तिचे अनुभव शेअर करण्यास आणि आपल्या खेळाचे भविष्य घडवणाऱ्या खेळाडूंना उजाळा देण्यासाठी उत्सुक आहे.

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक ३० सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ही आठ संघांची स्पर्धा भारत आणि श्रीलंकेतील पाच वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande