कोलंबो, 28 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय फुटबॉल संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये बांगलादेशला 4-1 ने पराभूत करत सातवे सॅफ U-17 विजेतेपद पटकावले.
पहिल्या सत्रात भारताने डल्लामुओन गंगटे आणि अझलन शाह केएच यांच्या गोलमुळे 2-1 अशी आघाडी घेतली होती. पण बांगलादेशने शेवटच्या क्षणी इहसान हबीब रिदुआनच्या बरोबरीने पुनरागमन करून स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला आणि सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटने लागला.
भारतीय संघाने या सामन्यात महत्त्वाच्या वेळी संयम दाखवला. डल्लामुओन गंगटे, कोरोउ मेइतेई कोंथोउजम आणि इंद्रा राणा मगर यांनी शानदार गोल केले. त्यानंतर शुभम पूनियाने निर्णायक चौथ्या किकचे रूपांतर केले. पण बांगलादेश दबावाखाली कोसळला, त्यांच्याकडून फक्त मोहम्मद माणिकने गोल केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे