नवी दिली, 28 सप्टेंबर (हिं.स.) भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि लंडन ऑलिंपिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल म्हणाली की, पीव्ही सिंधूने कुठल्या स्पर्धांवर लक्ष केंद्रीत करावे हे ठरवणे आवश्यक आहे. सिंधू आता जवळपास ३० वर्षांंची आहे. त्यामुळे सलग प्रत्येक स्पर्धा खेळण्याचे दबाव तिच्या कामगिरीवर परिणाम करू शकतो. सायना म्हणाली, एका विशिष्ट वयानंतर तुम्ही चांगली कामगिरी करू शकत नाही असे नाही. हे निश्चितच शक्य आहे. पण तुम्हाला ज्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करायची आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
सायना म्हणाली की, तुमचे रँकिंग राखण्यासाठी प्रत्येक स्पर्धा खेळणे थकवणारे असू शकते. ती म्हणाली, तुम्ही प्रत्येक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकत नाही कारण ते कठीण आहे. या वयात, जेव्हा तुम्ही तुमचे रँकिंग राखण्यासाठी सलग अनेक स्पर्धा खेळत असता, तेव्हा तुम्हाला निश्चितच एका विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचावे लागते.
सायनाचा असा विश्वास आहे की, सिंधूने जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई अजिंक्यपद सारख्या मोठ्या स्पर्धांना प्राधान्य दिले पाहिजे. ती म्हणाली, जर तुम्हाला जागतिक अजिंक्यपद किंवा आशियाई अजिंक्यपद सारखे स्पर्धा जिंकायचे असतील, तर तुम्हाला त्या स्पर्धांमध्ये तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील.
सायनाने असेही स्पष्ट केले की, मला वाटतं २८-२९ वर्षांच्या वयानंतर शरीराची पुनर्प्राप्ती क्षमता मंदावते. अर्थात तुम्हाला खूप कठोर प्रशिक्षण घ्यावे लागतात पण पाच दिवस दररोज स्वतःला पुढे ढकलणे सोपे नाही.
२०२४-२५ हे वर्ष सिंधूसाठी आव्हानात्मक राहिले आहे, कारण ती अनेक स्पर्धांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत पराभूत झाली आहे. पण तिने अलीकडेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचून सुधारणा झाल्याचे संकेत दाखवले आहेत. सायना म्हणाली, पुढील काही स्पर्धांमध्ये ती कशी कामगिरी करते ते पाहूया, कारण तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपासून चांगली कामगिरी केली आहे.सायना म्हणाली, परिस्थिती कधी बदलेल हे तुम्हाला कधीच कळत नाही कारण ती एक अनुभवी खेळाडू आहे. तिला स्पर्धा कशी जिंकायची हे माहित आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे