नवी दिल्ली, २९ सप्टेंबर (हिं.स.) - आशिया कप २०२५ जिंकल्यानंतर भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे. दुबईमध्ये पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफला एकूण २१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ही रक्कम स्पर्धेच्या अधिकृत बक्षीस रकमेच्या आठ पट आहे.
तिलक वर्माच्या अंतिम सामन्यात नाबाद ६९ धावांच्या खेळीमुळे भारताने ५ विकेटने रोमांचक विजय मिळवला. यासह भारताने स्पर्धेत तिसऱ्यांदा पाकिस्तानला पराभूत केले आणि सलग नवव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटाकवले.
बीसीसीआयने सोशल मीडियावर लिहिले की, तीन फटके. शून्य प्रत्युत्तर. आशिया कप चॅम्पियन. संदेश स्पष्ट आहे. संघ आणि सपोर्ट स्टाफला २१ कोटी रुपयांचे बक्षीस.* पण बोर्डाने अद्याप या बक्षीस रकमेच्या वाटणीबद्दल तपशील शेअर केलेला नाही. या संघाला स्पर्धा आयोजकांकडून स्वतंत्र अधिकृत बक्षीस रक्कम म्हणून अंदाजे 2.6 कोटी देखील मिळणार आहेत.
या विजयासह भारतीय संघाने आशिया कपमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केलेच. शिवाय आगामी T20 विश्वचषक 2026 साठी एक मजबूत संदेश देखील दिला. क्रिकेट समीक्षकांचा असा विश्वास आहे की, इतक्या मोठ्या बक्षीस रकमेमुळे संघाचे मनोबल आणखी वाढेल आणि क्रिकेटपटूंना भविष्यातील आव्हानांसाठी प्रेरित केले जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे