
बीड, 12 जानेवारी (हिं.स.)।
मोटारसायकल अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाहन चालवताना हेल्मेट घालून स्वतःचे संरक्षण करा, असे आवाहन वाहतूक पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी केले. चौसाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत पोलीस वर्धापन दिन अभियान कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात जाधवर यांनी युवक-युवतींशी संवाद साधला.
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा. वाहतुकीचे नियम पाळा. स्वतः सुरक्षित राहा, सावध राहा, असा संदेश त्यांनी दिला. सायबर सुरक्षा, गुड टच-बॅड टच, डायल ११२, बाल हेल्पलाइन १०९८, महिला हेल्पलाइन १०९१ याबाबतही मार्गदर्शन केले. नियम पाळा, अपघात टाळा, असे सांगितले.
कार्यक्रम पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक हम्पे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन झाले. चौसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष एन. टी. वाघमारे प्रमुख पाहुणे होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis