
7 झोन मधील 22 प्रभागात 661 उमेदवार निवडणूक रिंगणात
अमरावती, 12 जानेवारी (हिं.स.)
मनपा निवडणुकीत खर्च मर्यादा निश्चित केली आहे. ड श्रेणीतील अमरावती मनपात आर्थिक मर्यादा ९ लाखनिश्चित करण्यात आली आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार उमेदवारांना दैनिक खर्च अहवाल सादर करावा लागत आहे. मनपा निवडणूक रिंगणात उतरलेल्या एकूण ६६१ उमेदवारांपैकी ५२५ उमेदवारांनी रविवार ११ जानेवारीपर्यंतचा हिशेब सादर केला आहे. अजूनही १३६ उमेदवारांच्या हिशेबाचा अहवाल अप्राप्त आहे. विशेष म्हणजे प्रचारावरील खर्चावर निवडणूक आयोगाची विशेष सायबर टीमलक्ष ठेवून आहे.
झोन ७,६६१ उमेदवार
झोन १ रामपुरी कॅम्पमध्ये ९७उमेदवार आपले नशीब अजमावत आहे. यापैकी ८३ उमेदवारांनी आपला हिशेब दिला आहे. तर या झोनमधील १४ उमेदवारांच्या हिशेबाचा पत्ता नाही.
झोन २ नवीन इमारत तहसील कार्यालयामधून १०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यापैकी ८७उमेदवारांचा हिशेब मिळाला तर 13 उमेदवारांना हिशोब सादर करता आला नाही. झोन ३ राजापेठ श्री संत कंवरराममधून ९४ उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहे. यापैकी ९२ उमेदवारांनी हिशेब सादर केला तर २ उमेदवारांचा हिशेब निवडणूक विभागाला मिळाला नाही. झोन ४ दस्तुर नगर मधून १०८ उमेदवार निवडणूक लढवित आहे. यापैकी ७६ उमेदवारांचा हिशेब पोहोचला आहे. तर ३२ उमेदवारहिशेब सादर करण्याचा विसर पडला आहे. झोन ५अंबापेठ मध्ये ८३ उमेदवार हे निवडणूक रणांगणात उतरले आहेत. त्यांच्यापैकी ६४ उमेदवारांना हिशेब सादर करता आला, तर १९ उमेदवारांचा हिशेब अप्राप्त आहे. झोन ६ जुनीतहसील कार्यालयमधून ५३ उमेदवार हे रिंगणात आहेत. त्यापैकी ३६ उमेदवारांनी हिशेब निवडणूक विभागाला पाठविला तर १७ उमेदवारांचा हिशेब मिळाला नाही. झोन ७ बडनेरामध्ये सर्वाधिक १२६ उमेदवार हे निवडणूक लढवित आहे. यापैकी ८७ उमेदवारांचा हिशेब निवडणूक विभागाला मिळाला असून ३९ उमेदवारांचा हिशेब निवडणूक विभागापर्यंत पोहोचला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी