मुंद्रा बंदरावर भारतातील पहिल्या पूर्णतः भरलेल्या व्हीएलसीसीचे यशस्वी बर्थिंग
रायगड, 12 जानेवारी (हिं.स.) : भारताच्या सागरी व ऊर्जा पायाभूत सुविधांच्या विकासात एक ऐतिहासिक टप्पा गाठत अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईजेड) यांच्या मुंद्रा बंदरावर देशातील पहिल्या पूर्णतः भरलेल्या व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर (व
भारताच्या सागरी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाचा टप्पा गाठत अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईजेड) यांच्या मुंद्रा बंदरावर देशातील पहिल्या पूर्णतः भरलेल्या व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर (व्हीएलसीसी) चे यशस्वी बर्थिंग करण्यात आले. ‘एमटी न्यू रिनाउन’ या जहाजाचे थेट जेटीवर बर्थिंग झाल्याने मुंद्रा हे भारतातील असे पहिले बंदर ठरले आहे.  सुमारे ३.३ लाख घनमीटर क्षमतेचे कच्चे तेल वाहून आणणाऱ्या या जहाजाचे बर्थिंग तीव्र समुद्री प्रवाह, जोरदार वारे आणि आव्हानात्मक समुद्रस्थिती असतानाही यशस्वीरीत्या पार पडले. या कामगिरीमुळे एपीएसईजेडच्या मरीन टीमचे तांत्रिक कौशल्य, नियोजन आणि समन्वय अधोरेखित झाले आहे. या यशामुळे पूर्णतः भरलेल्या व्हीएलसीसीसाठी थेट जेटी बर्थिंग सुविधा असलेल्या जगातील मोजक्या बंदरांच्या यादीत मुंद्रा बंदराचा समावेश झाला आहे.  पूर्ण क्षमतेने भरलेल्या व्हीएलसीसीला थेट जेटीवर बर्थिंग देण्याची क्षमता भारताच्या कच्च्या तेलाच्या लॉजिस्टिक्समध्ये आमूलाग्र बदल घडवणारी ठरणार आहे. यामुळे ऑफशोअर सिंगल पॉइंट मूरिंग (एसपीएम) किंवा लाईटरिंग ऑपरेशन्सवरील अवलंबित्व कमी होऊन कच्च्या तेलाची हाताळणी अधिक सुरक्षित, जलद आणि किफायतशीर होणार आहे.  मुंद्रा येथील विशेषतः उभारलेली व्हीएलसीसी जेटी ही अभियांत्रिकी दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरते. ४०० मीटर लांबीची आणि २५ मीटर खोल बर्थ पॉकेट असलेली ही जेटी ३,६०,००० मेट्रिक टन विस्थापन आणि २१.६ मीटर ड्राफ्ट असलेल्या जहाजांना हाताळण्यास सक्षम आहे. या जेटीला अत्याधुनिक लोडिंग आर्म्स, उच्च क्षमतेचे मूरिंग व ब्रेस्टिंग डॉल्फिन्स आणि आधुनिक फेंडर प्रणालीची सुविधा देण्यात आली आहे.  मुंद्रा बंदर ४८९ किलोमीटर लांबीच्या कच्च्या तेलाच्या पाइपलाईनद्वारे राजस्थानमधील बारमेर येथील एचपीसीएल रिफायनरीशी थेट जोडलेले आहे. या जोडणीमुळे भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट होऊन पुरवठा साखळी सक्षम होणार आहे.  कच्छच्या आखातात रणनीतिकदृष्ट्या स्थित असलेले मुंद्रा बंदर हे उत्तर व पश्चिम भारतासाठी महत्त्वाचे सागरी प्रवेशद्वार मानले जाते. आर्थिक वर्ष २०२४–२५ मध्ये २०० दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक कार्गो हाताळणारे भारतातील पहिले बंदर बनत, मुंद्रा बंदराने जागतिक पातळीवरील आपले नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.


रायगड, 12 जानेवारी (हिं.स.) : भारताच्या सागरी व ऊर्जा पायाभूत सुविधांच्या विकासात एक ऐतिहासिक टप्पा गाठत अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईजेड) यांच्या मुंद्रा बंदरावर देशातील पहिल्या पूर्णतः भरलेल्या व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर (व्हीएलसीसी) जहाजाचे यशस्वी बर्थिंग करण्यात आले. ‘एमटी न्यू रिनाउन’ या जहाजाचे थेट जेटीवर बर्थिंग झाल्याने मुंद्रा बंदर भारतातील पहिले असे बंदर ठरले आहे.

सुमारे ३.३ लाख घनमीटर क्षमतेचे कच्चे तेल वाहून आणणाऱ्या या प्रचंड जहाजाचे बर्थिंग तीव्र समुद्री प्रवाह, जोरदार वारे आणि आव्हानात्मक समुद्रस्थिती असतानाही यशस्वीरीत्या पार पडले. या यशामुळे एपीएसईजेडच्या मरीन टीमचे उच्च तांत्रिक कौशल्य, अचूक नियोजन आणि प्रभावी समन्वय अधोरेखित झाला आहे. या कामगिरीमुळे पूर्णतः भरलेल्या व्हीएलसीसीसाठी थेट जेटी बर्थिंग सुविधा असलेल्या जगातील मोजक्या बंदरांच्या यादीत मुंद्रा बंदराचा समावेश झाला आहे.

पूर्ण क्षमतेने भरलेल्या व्हीएलसीसीला थेट जेटीवर बर्थिंग देण्याची क्षमता भारताच्या कच्च्या तेलाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारी ठरणार आहे. यामुळे ऑफशोअर सिंगल पॉइंट मूरिंग (एसपीएम) किंवा लाईटरिंग ऑपरेशन्सवरील अवलंबित्व कमी होऊन कच्च्या तेलाची हाताळणी अधिक सुरक्षित, जलद आणि किफायतशीर होणार आहे.

मुंद्रा बंदरावर उभारलेली विशेष व्हीएलसीसी जेटी अभियांत्रिकी दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ४०० मीटर लांबीची व २५ मीटर खोल बर्थ पॉकेट असलेली ही जेटी ३,६०,००० मेट्रिक टन विस्थापन व २१.६ मीटर ड्राफ्ट असलेल्या जहाजांना हाताळण्यास सक्षम आहे. या जेटीवर अत्याधुनिक लोडिंग आर्म्स, उच्च क्षमतेचे मूरिंग व ब्रेस्टिंग डॉल्फिन्स तसेच आधुनिक फेंडर प्रणाली बसवण्यात आली आहे.

मुंद्रा बंदर ४८९ किलोमीटर लांबीच्या कच्च्या तेलाच्या पाइपलाईनद्वारे राजस्थानमधील बारमेर येथील एचपीसीएल रिफायनरीशी थेट जोडलेले आहे. या जोडणीमुळे भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट होऊन पुरवठा साखळी अधिक सक्षम होणार आहे. कच्छच्या आखातात रणनीतिकदृष्ट्या स्थित असलेले मुंद्रा बंदर उत्तर व पश्चिम भारतासाठी महत्त्वाचे सागरी प्रवेशद्वार मानले जाते.

आर्थिक वर्ष २०२४–२५ मध्ये २०० दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक कार्गो हाताळणारे भारतातील पहिले बंदर ठरत, मुंद्रा बंदराने जागतिक पातळीवरील आपले नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande