
छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 'ऑडिट' वरील हरकतीनंतर श्रेणीनिहाय महाविद्यालयांची सुधारित यादी जाहीर केली. अनेक महाविद्यालयाच्या श्रेणीत बदल झाले असून १५७ नो ग्रेड महाविद्यालयांच्या यादीत हरकतीनंतर ९७ महाविद्यालये राहिली आहेत. भौतिक सुविधा, पात्र शिक्षक अशा मूलभूत सुविधाही पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांवर विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कारवाईचा निर्णय घेतला नाही.
विद्यापीठ प्रशासनाने संलग्नित महाविद्यांलयांचे प्रशासकीय व शैक्षणिक अंकेक्षण (ऑडिट) केले. ४८८ महाविद्यालयांपैकी ४१८ महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यात आले. तपासणी केल्यानंतर विद्यापीठाने श्रेणीनिहाय महाविद्यालयांची तात्पुरती यादी जाहीर करत हरकती मागविल्या. विद्यापीठाकडे १५३ हरकती आल्या होत्या . हरकतींच्या सुनावणीनंतर श्रेणीनिहाय महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात आली. आक्षेपांच्या सुनावणीची प्रक्रिया चालली. यानंतर श्रेणीनिहाय महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात आली.महाविद्यालयांच्या ग्रेडिंगमध्ये सुधारणा झाल्याचे समोर आले. प्रारंभी महाविद्यालय तपासणीत ४१९ पैकी १५७ महाविद्यालये कोणत्याही श्रेणीत पात्र ठरली नव्हती. हरकतीनंतर ही संख्या ९५ वर आली. ६० महाविद्यालयांच्या श्रेणीत बदल झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis