फेब्रुवारीत होणार छत्रपती संभाजीनगर येथे साहित्योत्सव
छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)साहित्य भारती आणि स. भु. शिक्षण संस्थेच्या वतीने २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी साहित्योत्सव आयोजित करण्यात आला आहे. या साहित्योत्सवाच्या संपर्क कार्यालयाचे ज्ञानप्रकाश मोदाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सा
फेब्रुवारीत होणार छत्रपती संभाजीनगर येथे साहित्योत्सव


छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)साहित्य भारती आणि स. भु. शिक्षण संस्थेच्या वतीने २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी साहित्योत्सव आयोजित करण्यात आला आहे. या साहित्योत्सवाच्या संपर्क कार्यालयाचे ज्ञानप्रकाश मोदाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

साहित्योत्सवाचे संपर्क कार्यालय शारदा मंदिर प्रशाला परिसरात आहे. ज्ञानप्रकाश मोदाणी यांनी कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी साहित्योत्सवाचे निमंत्रक डॉ. सर्जेराव जिगे, कार्यवाह डॉ. अनिरुद्ध नाईक, साहित्य भारतीचे प्रांत कार्याध्यक्ष उमेश काळे यांची उपस्थिती होती. साहित्योत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत. सुमेधा नाईक यांनी साहित्योत्सवाच्या बोधचिन्हाची माहिती दिली. डॉ. नागेश अंकुश यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत उमरीकर, प्रशांत गौतम, प्रा. संजय गायकवाड, सुनिता कपाळे, योगिता देवगिरीकर, दीपाली कुलकर्णी, संगीता धारूरकर, अशोकसिंग शेवगण उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande