
बीड, 12 जानेवारी (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची ३ वर्षांपासून रखडलेली सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती अखेर मार्गी लागली आहे. अशी माहिती हाती आली आहे. शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुंवर यांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. असे सांगितले जात आहे.
या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांव र शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. काहींच्या निलंबनाची शक्यता आहे. ३. वर्षांतील २,९३६ विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये ७८३, २०२३-२४ मध्ये १०२९ विद्याथ्यर्थ्यांना लाभ देण्यात आला. २०२४-२५ मध्ये ११२४ विद्यार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ३ वर्षांत एकूण २,९३६ विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून, वर्ष २०२५-२६ साठी लाभदेण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहे. त्यांच्याही शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्रोही आदिवासी महासंघाने १० जानेवारीपासून उपोषणाचा इशारा देत छत्रपती संभाजीनगर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात निवेदन उघडकीस दिल्यानंतर हा प्रकार आला. वर्ष २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या ३ शैक्षणिक वर्षांसाठी शिष्यवृत्तीचे अनुदान मंजूर झाले होते. मात्र, विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळालेला नव्हता. या प्रकरणाची शिक्षण विभागाकडून चौकशी केल्यानंतर वर्ष २०१४-१५ ते २०२१-२२ या कालावधीत शिष्यवृत्ती दिली गेली होती. मात्र, अलीकडील ३ वर्षांत तत्कालीन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नव्हती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis