
छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)। ’आई-बाप, संविधान, प्रेम आणि दुःख’ या साऱ्या विषयांना कवेत घेणाऱ्या एकाहून एक काव्यरचना सादर करुन लोककवी प्रशांत मोरे यांनी पहिल्या लोककला महोत्सवाचे घाटात उदघाटन केले. अत्यंत दर्जेदार व गेय कवितांना रसिकांनी जोरदार दाद देऊन नाटयगृहात जल्लोष केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने पहिला केंद्रीय लोककला महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात कवी प्रा.प्रशांत मोरे यांच्या हस्ते झाले. मकुलगुरु डॉ.विजय फुलारी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, मा.राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, प्राचार्य डॉ.गौतम पाटील, संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मातींचा सुगंध आणि पुर्वजांचा वारसा घेऊन आलेली लोककला हीच खरी सर्व कलांचा मुलआधार असते, हे संयोजक डॉ.कैलास अंभुरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. हाच धागा पुढे घेऊन लोककवी प्रा.प्रशांत मोरे यांनी उद्घाटनपर भाषणात प्रेम ते विद्रोहअशा विविध कविता सादर केल्या. ते म्हणाले, सकाळी आपल्या दारात येणा-या वासुदेवासह सर्वांचे स्वर कानात भरुन घ्या. जगात खुप सारी दुःख आहेत, समाजात अस्वस्थता आहे, अशावेळी प्रेम वाटत राहा. माझ्या कवितांना अस्सल लोककलांची चाल देता आली, त्यामुळे कवितेचं गाणं झालं. ते सर्वत्र गायल जातं. चित्रपटातून लोकप्रिय झालं. आपल्या बोलीभाषेतील रचना नावारुपाला येत असतात. त्यासाठी मेहनत हवी,
*एका कुंकवापाई दुरं मैना उडुनं जाईलं याद येता तुझी मैना राघु एकला राहीलं... तुझ्या नावाचं गोंदणं हातावरी मी मिरवीनं, याद येता तुझी मैना हात मायेनं फिरवीनं..या कवितेला रसिकांनी जोरदार दिली.राज्यातील सर्व २४ विद्यापीठांमधील विद्यार्थी लोककलांना एकाच मंचावर आणण्यासाठी कुलपती यांनी आपल्या विद्यापीठावर जबाबदारी टाकली आहे. नाटयगृहाच्या बाजुलाच स्वतंत्र लोककला अकादमी स्थापन करण्यात येणार आहे, असे मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis