
छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरचा कायापालट करायचा असेल तर विकासाभिमुख आणि हिंदुत्ववादी विचारांचे नेतृत्व आवश्यक असून ते फक्त भारतीय जनता पार्टीच देऊ शकते, असा विश्वास यावेळी मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २६ मधील सर्व भाजपा उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २६ मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार २६ (अ) अनिता साळवे, २६ (ब) पदमसिंग राजपूत, २६ (क) सविता कुलकर्णी, २६ (ड) अप्पासाहेब हिवाळे यांच्या प्रचारार्थ भव्य सभा पार पडली.
या सभेला शहरातील माता-भगिनी, स्थानिक मतदार बांधव व ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित जनसमुदायाचा उत्साह आणि प्रचंड प्रतिसाद पाहता या प्रभागात भाजपाच्या विजयाची खात्री अधिक बळकट झाली.
-------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis