रत्नागिरीच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे समीर तिवरेकर
रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरीच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकपदाची निवडणूक प्रक्रिया आज झाली. सर्व निवडी बिनविरोध झाल्या. उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे समीर तिवरेकर यांची निवड झाली आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेना आण
उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांचे अभिनंदन करताना नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे


रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरीच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकपदाची निवडणूक प्रक्रिया आज झाली. सर्व निवडी बिनविरोध झाल्या. उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे समीर तिवरेकर यांची निवड झाली आहे.

स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेना आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या उपनगराध्यक्षपदासाठी समीर तिवरेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली. श्री. तिवरेकर यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात समन्वय राखण्यासाठी तिवरेकर यांचा अनुभव मोलाचा ठरणार आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठीदेखील एकमत झाले. यामध्ये प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी माजी नगराध्यक्ष म्हणून असलेला दांडगा अनुभव लक्षात घेऊन शिवसेनेने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अभि दुड्ये शिवसेनेचे सक्रिय पदाधिकारी म्हणून त्यांनी या पदावर वर्णी लावली आहे. भाजपच्या वतीने संदीप ऊर्फ बाबू सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी एकमताने निवड करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande