लातूर मनपावर भाजपाचाच ध्वज फडकणार- डॉ.अर्चना पाटील चाकूरकर
लातूर, 12 जानेवारी (हिं.स.)।महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राज्यातील ''लाडकी बहीण'' खंबीरपणे उभी आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीतही महिला शक्तीच्या बळावर कमळ नक्कीच फुलेल, असा ठाम विश्वास भाजपा नेत्या
लातूर मनपावर भाजपाचाच ध्वज फडकणार! डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर


लातूर, 12 जानेवारी (हिं.स.)।महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राज्यातील 'लाडकी बहीण' खंबीरपणे उभी आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीतही महिला शक्तीच्या बळावर कमळ नक्कीच फुलेल, असा ठाम विश्वास भाजपा नेत्या डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केला.

​पदयात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

​आज मोतीनगर, हणमंतवाडी आणि गांधीनगर भागात काढलेल्या पदयात्रेदरम्यान डॉ. अर्चनाताईंनी महिलांशी संवाद साधला. प्रभाग क्र. ६ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार गणेश गवारे, ज्योती आवसकर, मीना गायकवाड आणि गौरव काथवटे यांच्या प्रचारासाठी ही पदयात्रा काढण्यात आली होती.

​डॉ. अर्चनाताई पाटील यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:

महिला सक्षमीकरण: भाजपाने महिलांना आरक्षण दिले आणि 'लाडकी बहीण' व 'लखपती दीदी' सारख्या योजनांतून भगिनींना आर्थिक बळ दिले.

काँग्रेसचा खरा चेहरा उघड:

लाडकी बहीण योजनेचा हप्ता रोखण्यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. संक्रांतीचा गोडवा कडू करण्याचे पाप काँग्रेस करत आहे.

हक्काची साथ: महिलांच्या प्रगतीत खोडा घालणाऱ्यांना जनता १५ जानेवारीला मतदानातून चोख उत्तर देईल.

​आपला प्रभाग, आपला विकास!

​येत्या १५ जानेवारीला 'कमळ' चिन्हासमोरील बटण दाबून भाजपाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा!

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande