
चंद्रपूर, 12 जानेवारी (हिं.स.)।
स्वीप अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेल्या आंतर शालेय चित्रकला व आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या उपस्थितीत बक्षीस देण्यात आले. .
स्वीप अंतर्गत अनेक उपक्रम चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत आहेत, यात मनपा शिक्षण विभागातर्फे आंतर शालेय चित्रकला व आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. ज्यात जवळपास ७० मनपा व खाजगी शाळा तसेच महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक शाळेत त्यांच्या स्तरावर झालेल्या स्पर्धेत ३ विजेते निवडण्यात आले होते. या विजेत्यांची अंतिम स्पर्धा मनपा प्रशासकीय इमारतीजवळील वाहनतळावर घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेत इयत्ता १ ते ५ या गटात तुषा जाधव,आरोही सुनील महतो,भारती हर्षद पसारे या विद्यार्थिनींनी अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक तर इयत्ता ६ ते १० या गटात केतकी महेंद्र किन्हेकर,निर्मला मेघाराम प्रजापती, टिया मनोज दास या विद्यार्थिनींनी अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.असरा वालीम पठाण व आदित्य आनंद टिपले यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम - पवन मोटघरे,द्वितीय - गुलाब बुरोडे तर तृतीय क्रमांक विघ्नेश्वर देशमुख याने मिळविला व आयशा खोब्रागडे,राहुल गेडाम यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. निकाल घोषित होताच सर्व विजेत्यांना शालेय व महाविद्यालयीन जीवनात उपयोगी पडतील अशी बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी पथनाट्य सुद्धा सादर करण्यात आले.चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण डॉ. किरणकुमार मनुरे,डॉ.देवेंद्र बोरकुटे,प्रा.प्रमोद उरकुडे यांनी केले
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्रवार, स्वीप मोहिमेच्या पिंक अँबेसिडर प्रा. डॉ. जयश्री कापसे - गावंडे,स्वीप आयकॉन नागेश नीत, मनपा शिक्षणाधिकारी सुनील आत्राम,रोशनी तपासे तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.
चित्रकला स्पर्धा इयत्ता १ ते ५ -
प्रथम - तुषा जाधव ,प्रयदर्शिनी कन्या विद्यालय,बगडखिडकी
द्वितीय - आरोही सुनील महतो, पं. दीनदयाळ उपाध्याय प्रा. शाळा
तृतीय - भारती हर्षद पसारे, पं. जवाहरलाल नेहरू प्रा. शाळा,मनपा
प्रोत्साहनपर -
असरा वालीम पठाण - लोकमान्य टिळक गर्ल्स प्रा. शाळा
आदित्य आनंद टिपले - रयतवारी कॉलरी सेमी इंग्लीश शाळा
चित्रकला स्पर्धा इयत्ता ६ ते १० -
प्रथम - केतकी महेंद्र किन्हेकर,एफईएस गर्ल्स स्कूल
द्वितीय - निर्मला मेघाराम प्रजापती,न्यू इंडिया कॉन्व्हेंट
तृतीय - टिया मनोज दास,हिंगलाज भवानी हायस्कूल
प्रोत्साहनपर -
राखी योगेश निंदेकर,प्रियदर्शिनी कन्या विद्यालय
कुमकुम नितेश शास्त्रकार, सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा,बाबुपेठ
आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा -
प्रथम - पवन मोटघरे
द्वितीय - गुलाब बुरोडे
तृतीय - विघ्नेश्वर देशमुख
प्रोत्साहपर -
आयशा खोब्रागडे
राहुल गेडाम
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव