
अमरावती, 12 जानेवारी (हिं.स.)
येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला एकतर्फी बहुमत प्राप्त झाले. अध्यक्षपदाची धुरा ईश्वर सलामे यांच्या हाती येताच, उर्वरित सभा म्हणजे उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य व खाते वाटप करण्यापूर्वीच भाजपने काँग्रेसला जबरदस्त धक्का दिला आहे. नगर परिषदेमध्ये भाजपा १९, काँग्रेस २, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४, प्रहार १, अपक्ष १ असे २६ नगरसेवक तर अध्यक्ष म्हणून भाजपाचे ईश्वर सलामे विजयी झाले. आता भाजपाचा गटनेता म्हणून किरण सावरकर यांची नियुक्ती झाली. काँग्रेसनेसुद्धा वेगळा गट स्थापन केला होता. पण काँग्रेसच्या गटाने आमचा गट रद्द करण्याचे पत्र ५ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार काँग्रेसचा गट रद्द होऊन १० तारखेला हा गट भाजपमध्ये विलीन केला, असे पत्र भाजपा गटनेत्याने काँग्रेसला दिले आहे. काँग्रेसच्या गटात मो. निसार, भाग्यश्री अधव असून ते आता भाजपाच्या गटात विलीन झाले असून काँग्रेसला त्यांनी धक्का दिलेला आहे. आता वरुडमध्ये काँग्रेचे अस्तित्व राहिलेले दिसत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी