शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा ‘व्हायरल;
उत्तर सोलापूर, सांगोला वगळून माढा, माळशिरसमधून जाणार मार्ग सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.)। बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेऊन नवीन आराखडा तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केली. आता या नव्या आराखड्यातील बाधित गावांच
शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा ‘व्हायरल;


उत्तर सोलापूर, सांगोला वगळून माढा, माळशिरसमधून जाणार मार्ग सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.)। बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेऊन नवीन आराखडा तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केली. आता या नव्या आराखड्यातील बाधित गावांची यादी व्हायरल झाली आहे. या यादीच्या सतत्येबाबत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले असून निवडणुकीनंतर अधिसूचना जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.शक्तिपीठ महामार्ग पूर्वी धाराशिव जिल्ह्यातून बार्शी तालुक्यात प्रवेश करत होता. त्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील मोजक्या गावातून मोहोळ, पंढरपूर व सांगोला तालुक्यातून सांगली जिल्ह्यात प्रवेश करत होता. या महामार्गामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा व पंचगंगा नदीकाठचा मोठ्या प्रमाणात बागायती जमिनीचा पट्टा बाधित होत असल्याने दोन्ही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला.दुसऱ्या बाजूला नागपूर- रत्नागिरी हा महामार्ग हा पूर्वीच्या आराखड्यातील शक्तिपीठ महामार्गाला अगदीच समांतर असल्याने सातारा जिल्ह्याचा नव्या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सातारा, सांगली जिल्ह्यातून चंदगडमार्गे पुन्हा दोडामार्ग तालुक्यात बांद्याजवळून गोव्यात प्रवेश करणार आहे. असा नवा आराखडा सध्या व्हायरल झाला आहे. या व्हायरल गावांची यादी पाहता हाच नवीन मार्ग असू शकतो, असा तज्ज्ञांनी अंदाज वर्तविलेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande