जर्मन चान्सलर फ्रेडरिक मेर्झ दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर
अहमदाबाद, १२ जानेवारी (हिं.स.) जर्मन चान्सलर फ्रेडरिक मेर्झ दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी अहमदाबादला पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान ५२,५०० कोटी रुपयांच्या पाणबुडी कराराला अंतिम स्वरूप मि
जर्मन चान्सलर फ्रेडरिक मेर्झ


अहमदाबाद, १२ जानेवारी (हिं.स.) जर्मन चान्सलर फ्रेडरिक मेर्झ दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी अहमदाबादला पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान ५२,५०० कोटी रुपयांच्या पाणबुडी कराराला अंतिम स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.

दोन्ही नेत्यांमधील बैठकीत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच भारतासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पाणबुडी करारावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. जर्मन चान्सलर फ्रेडरिक मेर्झ यांची ही भेट जागतिक राजकीय अस्थिरतेच्या काळात आली आहे. भारत आणि जर्मनी दोघेही संरक्षण सहकार्याला नवीन उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर्मन चान्सलर झाल्यानंतर मेर्झ यांचा हा पहिलाच आशिया दौरा आहे. ही भेट खूप महत्त्वाची मानली जात आहे.

या भेटीचा प्रमुख अजेंडा म्हणजे भारतीय नौदलासाठी सहा अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव. हा करार अंदाजे ५२,५०० कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे. या करारामुळे जर्मनीची आघाडीची संरक्षण कंपनी, थायसेनक्रुप मरीन सिस्टम्स आणि भारताची माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात भागीदारी होऊ शकते. हा करार भारताची सागरी शक्ती मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावेल.अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट घेण्याव्यतिरिक्त, फ्रेडरिक मर्झ साबरमती आश्रमाला भेट देतील. ते पतंग महोत्सव आणि कौशल्य विकास कार्यक्रमात देखील सहभागी होतील.-------------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande