विकासामुळे नागरिक भाजपसोबत - जयकुमार गोरे
सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.) । सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमधील भाजप उमेदवार तर मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहेतच. या शिवाय संपूर्ण सोलापूर शहरातील भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गो
Jaykumar gore newss


सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.) । सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमधील भाजप उमेदवार तर मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहेतच. या शिवाय संपूर्ण सोलापूर शहरातील भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक सातमध्ये आज हजारोंच्या सहभागात पदयात्रा झाली. त्यावेळी ते बोलत होते.प्रभाग सातमधील पत्रा तालीम, सळई मारुती, पंजाब तालीम, थोरला मंगळवेढा तालीम, चौपाड, शिंदे चौक, नवजवान गल्ली, लोणार गल्ली, काळी मशीद, दाते बोळ, बाबा कादरी मशीद, बाजी अण्णा मठ या परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पुरुषोत्तम बरडे, निवडणूक प्रमुख श्रीकांत घाडगे, दत्तात्रय कोलारकर, अमर दुधाळ, सचिन शिंदे, बजरंग जाधव, देविदास बनसोडे, सूरज बंडगर, जयवंत सलगर, काटकर, महेश बोकन, सतीश कुदळे, शेखर फंड, सतीश प्रधाने, विनोद मोटे, बाबू बनसोडे, दादा सुरवसे, धीरज बावधनकर आदींसह कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande