सोलापूर : खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!
सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.) : भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह बोरामणी गवताळ सफारी शेजारी खडकी (ता. तुळजापूर) येथे आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचा हा वारसा सांभाळावा तसेच याचे संवर्धन करावे, अशी आर्त हाक इंट्याकने शासनाकडे दिली आहे. निसर्ग, भ
सोलापूर : खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!


सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.) : भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह बोरामणी गवताळ सफारी शेजारी खडकी (ता. तुळजापूर) येथे आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचा हा वारसा सांभाळावा तसेच याचे संवर्धन करावे, अशी आर्त हाक इंट्याकने शासनाकडे दिली आहे. निसर्ग, भूगर्भशास्त्र आणि इतिहासाचा त्रिवेणी संगम असलेल्या खडकीतील चक्रव्यूहाचे संवर्धन करावे, अशी मागणी ''इंट्याक''च्या वतीने करण्यात आली.भारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक वारसा न्यास (इंट्याक) सोलापूर शाखेच्या वतीने येथे रविवारी वारसा फेरी (हेरिटेज वॉक) आयोजित करण्यात आली होती. रविवारी (ता. ११) भल्या सकाळी बोरामणी येथील गवताळ सफारीपासून या वारसा फेरीला प्रारंभ झाला. प्रसन्न वातावरणात पक्षी निरीक्षण आणि प्राणी दर्शन घेत असतानाच, या फेरीचे मुख्य आकर्षण असलेल्या चक्रव्यूहस्थळी सर्व सहभागी पोचले. दगडी चक्रव्यूह पाहण्यासाठी सोलापुरातील शंभरहून अधिक अभ्यासक इतिहासप्रेमींची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande