संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा संदेश; रायगडात जिजाऊ–विवेकानंद जयंती साजरी
रायगड, 12 जानेवारी (हिं.स.)। ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांचा प्रसार हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसळा येथे राजमाता जिजाऊ व श्री स्वामी व
शिक्षणातून संस्कारांची जपणूक; न्यू इंग्लिश स्कूलचा उपक्रम


रायगड, 12 जानेवारी (हिं.स.)। ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांचा प्रसार हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसळा येथे राजमाता जिजाऊ व श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि. १२ ते १९ जानेवारी दरम्यान साजऱ्या होणाऱ्या ‘स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहा’च्या पहिल्या पुष्पगुंफण कार्यक्रमाने या सप्ताहाची भव्य सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक पाटील ई. सी. उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर गरिबीवर मात करून यश प्राप्त करता येते, असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना दिला. तर विद्यालयाचे चेअरमन समीर बनकर यांनी स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीचा संदेश सातासमुद्रापलीकडे पोहोचवला असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करावे, असे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande