रत्नागिरीत एकदिवसीय सरलमानक संस्कृत कार्यशाळा उत्साहात
रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) :कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय अंतर्गत भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र व भारतीय भाषा समिती, शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय सरलमानक संस्कृत कार्यशाळा उत्साहात पार
सरलमानक संस्कृत कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. गोपीकृष्ण रघु


रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) :कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय अंतर्गत भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र व भारतीय भाषा समिती, शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय सरलमानक संस्कृत कार्यशाळा उत्साहात पार पडली. समारोप सत्रात प्रमुख पाहुणे डॉ. गोपीकृष्ण रघु यांनी संस्कृत भाषेची पौराणिक महत्ता व आधुनिक युगातील उपयुक्तता स्पष्ट केली.

कार्यशाळेला गोगटे–जोगळेकर महाविद्यालय, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि संस्कृत शिक्षक मंडळाचे सहकार्य लाभले. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचे स्वरूप व शिक्षकांसाठी असलेली उपयुक्तता स्पष्ट केली. माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी शिक्षकांनी संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा स्मिता सरदेसाई यांनी कार्यशाळेची शिक्षकांच्या दृष्टीने असलेली आवश्यकता मांडली.

उद्घाटन सत्रात संस्कृत भारती गीता शिक्षण केंद्राचे प्रमुख शिरीष भेडसगावकर यांनी अध्यापनात संस्कृत भाषेचा भाषिक व शास्त्रीय अंगाने प्रभावी वापर करण्यावर भर दिला. अध्यक्षीय भाषणात गोगटे–जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख व कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी सरलमानक संस्कृत कार्यशाळेचा हेतू स्पष्ट करत विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा कशी प्रिय होईल यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे, असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande