उमेदवारांच्या वाट्याला येणारे मतदाननुसार मतांचे विजयी गणित
पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)।महापालिका निवडणूक उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवारांकडून एकूण मतदार, प्रत्यक्षात होणारे मतदान आणि प्रत्येक उमेदवारांच्या वाट्याला येणारे मतदान यानुसार मतांचे विजयी गणित जुळविले जात आहे. दुरंगी लढत असणाऱ्या प
PMC news


पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)।महापालिका निवडणूक उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवारांकडून एकूण मतदार, प्रत्यक्षात होणारे मतदान आणि प्रत्येक उमेदवारांच्या वाट्याला येणारे मतदान यानुसार मतांचे विजयी गणित जुळविले जात आहे.

दुरंगी लढत असणाऱ्या प्रभागांमध्ये उमेदवारांना जिंकण्यासाठी २५ ते २८ हजार मतांची ‘मॅजिक फिगर’ गाठावी लागणार आहे. तिरंगी, चौरंगी लढत असणाऱ्या किंवा कमी मतदारसंख्या असणाऱ्या प्रभागांमध्ये जिंकण्यासाठी १३ ते १७ हजार मते मिळवावी लागणार आहेत.निवडणुकीचा प्रचार येत्या दोन दिवसांत थंडावणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. घरोघरी गाठीभेटी घेण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, उमेदवारांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांकडून आपले उमेदवार किती निवडून येतील, यावरही चर्चा सुरू आहे.प्रभागातील मतदारसंख्या, रिंगणातील उमेदवार, प्रत्यक्ष होणाऱ्या मतदानाची टक्केवारी अशा वेगवेगळ्या पद्धतीने विजयासाठी मतांची संख्या गाठण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande