प्रचारातील भोंग्यांमुळे  नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले
पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)। पुणे शहराला ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून जगभरात ओळखले जाते. त्याच पुण्यात आज निवडणुकीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा बळी दिला जात आहे. प्रचारासाठी ऑटो-रिक्षांवर लावलेले कर्कश भोंगे आणि गल्लोगल्ली सुरू असलेला घो
प्रचारातील भोंग्यांमुळे  नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले


पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)। पुणे शहराला ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून जगभरात ओळखले जाते. त्याच पुण्यात आज निवडणुकीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा बळी दिला जात आहे. प्रचारासाठी ऑटो-रिक्षांवर लावलेले कर्कश भोंगे आणि गल्लोगल्ली सुरू असलेला घोषणांचा मारा, यामुळे शहरातील अभ्यासिकेत बसून भविष्याची स्वप्ने रंगविणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होत असल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.पुणे हे स्पर्धा परीक्षेचे मुख्य केंद्र असल्याने एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग आणि इतर परीक्षांच्या तयारीसाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थी येथे येतात. विशेषतः सदाशिव पेठ, नवी पेठ यांसारख्या मध्यवर्ती भागांत अभ्यासिकांची मोठी संख्या आहे. सध्या परीक्षांचा कालावधी असल्याने तासन्‌तास एकाग्रतेने अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे.अशातच, अनेक उमेदवार आपली प्रचार वाहने अभ्यासिकांच्या किंवा महाविद्यालयांच्या समोर थांबवून मोठ्या आवाजात घोषणा आणि गाणी लावत आहेत. त्यामुळे यासंदर्भात निवडणूक आयोग, महापालिका आणि पोलिस प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande