
पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)। पुण्यात घरांच्या किमतीत करोना संकटानंतर सातत्याने वाढ सुरू आहे. गेल्या वर्षी घरांच्या किमतीत ११.८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक वाढ ठरली आहे. पुण्यात घरांच्या सरासरी किमती प्रति चौरस फूट ७ हजार ३६७ रुपयांवर पोहोचल्या आहेत.‘गेरा डेव्हलपमेंट्स’ने पुण्यातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, पुण्यात २०२५ मध्ये ९० हजार घरांची विक्री झाली. विक्रीत २०२४ च्या तुलनेत वाढ नोंदविण्यात आली नाही. मात्र, गेल्या वर्षी घरांच्या सरासरी किमतीत ११.८ टक्के वाढ झाली आहे. करोना संकटानंतर पुण्यात घरांच्या किमतीत वाढ सुरू आहे. घरांच्या किमतीत गेल्या चार वर्षांतील वाढ २०२५ मध्ये झाली आहे.पुण्यातील घरांची सरासरी किंमत ७ हजार ३६७ रुपये झाली आहे. घरांच्या किमतीत वाढ झाली असली, तरी व्याजदरात कपात झाल्यामुळे विक्री स्थिर राहिली आहे. ग्राहकांना २० वर्षे मुदतीच्या गृहकर्जाचा मासिक हप्ता ८.७५ टक्के दराने प्रतिलाख रुपयांसाठी ८८३ रुपये होता. तो आता ७.५ टक्के दराने प्रतिलाख रुपयांसाठी ८०५ लाख रुपये झाला आहे. त्यामुळे घरे परवडणारी ठरली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु