पुणे शहरात ४ हजार ११ मतदान केंद्रे!
पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी मतदान होणार आहे. पुणे महापालिकेमध्ये 41 प्रभागांमधून 165 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मतदान प्रकियेसाठी पालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेच्या निवडणुकीसा
Voter


पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी मतदान होणार आहे. पुणे महापालिकेमध्ये 41 प्रभागांमधून 165 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मतदान प्रकियेसाठी पालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात एकूण 4 हजार 11 इतकी मतदान केंद्र आहेत. सर्वाधिक मतदान केंद्रे ही बालाजीनगर-कात्रज-आंबेगाव या 38 क्रमांकाच्या प्रभागात एकूण 188 मतदान केंद्रे आहेत.त्यानंतर सूस-बाणेर-पाषाण या 9 क्रमांकाच्या प्रभागात 173 मतदान केंद्रे आणि विमाननगर-लोहगाव या 3 क्रमांकाच्या प्रभागात 135 मतदान केंद्रे असणार आहेत. शहरात सर्वात कमी 70 मतदान केंद्रे अप्पर सुप्पर इंदिरानगर या 39 क्रमांकाच्या प्रभागात आहेत.यंदाच्या पालिका निवडणुकीत सरासरी 900 ते 1200 मतदारांसाठी एक मतदान केंद्र याप्रमाणे मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे.यंदाच्या निवडणुकीत चारचा प्रभाग आहे. त्यामुळे मतदारांना चार उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात कसबा विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयातील शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई प्रभागात 80 मतदान केंद्रे, नवी पेठ-पर्वती प्रभागात 80 मतदान केंद्रे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande