येवल्याच्या उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड यांची बिनविरोध निवड
येवलु, 12 जानेवारी (हिं.स.)। येवला नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप महायुतीच्या वतीने येवलेकरांना जे वचन दिले होते. ते वचन पाळून येवल्याच्या सर्वांगीण विकासासाठी युतीचे सर्व नगरसेवक कटिबद्ध राहतील. महायुतीच्या वतीने दिलेली
येवल्याच्या उपनगराध्यक्षपदी पुष्पा


येवलु, 12 जानेवारी (हिं.स.)।

येवला नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप महायुतीच्या वतीने येवलेकरांना जे वचन दिले होते. ते वचन पाळून येवल्याच्या सर्वांगीण विकासासाठी युतीचे सर्व नगरसेवक कटिबद्ध राहतील. महायुतीच्या वतीने दिलेली वचने पूर्ती करण्यास सुरुवात झाली असून आगामी काळात सर्व वचनपूर्ती केली जातील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

येवला नगरपालिकेत आज उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप महायुतीच्या वतीने भाजपच्या पुष्पा गायकवाड यांची उपनगराध्यपदी बिनविरोध निवड झाली. तसेच नामनिर्देशित पालिका सदस्यपदी अमजद शेख व समीर समदडीया यांची निवड करण्यात आली. यावेळी येवला संपर्क कार्यालयात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, गटनेते दिपक लोणारी, भाजपचे नेते प्रकाश दायमा,माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, कैलास सोनवणे, विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, प्रवक्ते राजेश भांडगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याच्या केलेल्या विकासावर येवलेकरांनी शिक्कामोर्तब करत राष्ट्रवादी व भाजप महायुतीला बहुमत दिले. त्यानुसार आता नगराध्यक्ष पदी राजेंद्र लोणारी व उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड यांना संधी मिळाली आहे. यांच्यासोबत सर्व युतीचे उमेदवार येवल्याच्या विकासासाठी एकमताने प्रयत्न करतील. येवलेकरांना विकासाची जी वचने आपण दिली आहे. ती सर्व पूर्ण करून येवल्याचा परिपूर्ण असा विकास साधला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande