
नांदेड, 12 जानेवारी (हिं.स.)।नांदेड जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणूक नंतर लक्ष वेधून गेलेल्या मुखेड नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज झाली आहे. मुखेड नगरपरिषद उपनगराध्यक्षपदीराजकुमार बामणे यांची निवड तर स्विकृत सदस्य गंगाधर राठोड व डॉ.अतुल देबडवार यांची निवड करण्यात आली आहे. मुखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आज झालेल्या बैठकीमध्ये उपाध्यक्षपदी बामणे यांची निवड करण्यात आली आहे. मुखेड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.. मुखेड नगर परिषद उपनगराध्यक्षपदी राजकुमार बामणे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या निवडीबाबत सर्व नगरसेवक यांनी आ.डॉ. तुषार राठोड व माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड यांचे जाहीर आभार मानले
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis